अध्यक्षांचे मनोगत..
श्री. रवींद्र रामकृष्ण जोशी
सादर नमस्कार...

नाशिक जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना नाशिक जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्याने संघटनेची ही वेबसाईट सुरु करतांना मनस्वी आनंद होत आहे.

माझा आपल्या संघटने मध्ये १९९२ साली अंतर्गत हिशेब तपासणीत या पदापासून प्रवेश झाला, नंतर लगेचच १९९३ पासून मला प्रभारी जिल्हा कार्यवाह म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली. जून १९९६ पासून स्वतंत्र जिल्हा कार्यवाह म्हणून निवडून आलो. मे २००० मध्ये या पदावर पुन्हा फेरनिवड झाली. २००३ ते २००५ नाशिक विभागाचा उपकार्यवाह म्हणून काम केले, २००६ मध्ये जिल्ह्याचा कार्यवाह म्हणून जबाबदारी मिळाली तर २००४ मध्ये जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून निवड झाली.

सद्या संगणक काळात सर्व ऑनलाईन चे युग आहे. कार्यालयांच्या काटकसरीच्या धोरणांने शिक्षण कार्यालयाकडून पुरेशा प्रमाणात परिपत्रके प्राप्त होण्यास अडचणी असतांत या बाबतची माहिती घेण्यासाठी आपल्या सर्वांची धावपळ होते; या सर्वातच शिक्षकेतर मोठ्याप्रमाणात भरडले जातात हा त्रास कमी होवून आपले काम सुकर होण्यासाठी हे संकेतस्थळ सुरु केले आहे.
या कामासाठी मा. मुख्याध्यापक, मा. संस्थाचालक यांचे सहाकार्य लाभले आहे. विशेत: मा. आमदार श्री सुधीर तांबे यांनी आर्थिक मदत करुन मोलाचे सहकार्य केले आहे. यांचा मी ऋणी आहे.
संघटनेच्या या वाटचालीत श्री. राम गायटे, श्री. डि. के. देशपांडे, श्रीमती सुमताई देवरे, श्री. सतीष नाडगोडा, श्री. बाळासाहेब देशपांडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य असते या सर्वांचे आभार मानतो.
संघटनेच्या कामात मोलाचे सहकार्य लाभलेल्या कै. जे. के. सोनवणे, कै. अरुण कुलकर्णी यांचे स्मरण या निमित्ताने नक्की होते, त्यांना विनम्र आदरांजली...
धन्यवाद!!

कार्यवाह यांचे मनोगत..

श्री. रामनाथ थेटे

डॉ. बळीराम हिरे आदिवासी माध्य. उच्च माध्य. विद्यालय,

मुपो. दरी ता. जि. नाशिक (मोबा. ९८२३८२९२६३)

 

सदर नमस्कार...

 

नाशिक जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेचा कार्यवाह या नात्याने मी काम करीत आहे.

शालेय लिपिकास अनेक विविध प्रकारची कामे करावी लागतात या साठी संगणक एक आवश्यक बाब झाली आहे. आणि हा बदल आपणांसर्वांनी चांगला आत्मसात केला आहे.

 

शासकीय परिपत्रके, कार्यालयीन सूचना, संघटनेच्या विविध घडामोडी, महत्वाच्या विषयां बाबत तज्ञांचे मार्गदर्शन, प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करणे हा या संकेत स्थळाचा हेतु आहे. आपल्या या वेबसाईटमुळे मे. शिक्षण विभाग, वेतन पथक, समाज कल्याण खाते, एस.एस.सी. बोर्ड, लेखाधिकारी कार्यालय, शिक्षण उपसंचालक इ. कार्यालयातील सूचना आपल्या पर्यंत पोहचवील्या जाणार आहेत. कृपया आपण सर्वांनी या संकेतस्थळाचे सातत्याने अवलोकन करुन माहिती अद्ययावत ठेवावी असे आवाहन आहे.

 

या संकेतस्थळावरील माहितीसाठी आपणांस वरील अनेक कार्यालयांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे या सर्व कार्यालयीन प्रमुखांचे संघटनेच्या वतीने आभार मानतो.

 

संघटनेच्या कामासाठी आपणांसर्व शिक्षकेतर बांधवांचे मा. मुख्याध्यापकांचे, संस्थाचालकांचे, शिक्षण खात्यातील अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभते व भविष्यातही ते लाभावे ही नम्र विनंती.

 

धन्यवाद!!!

सहकार्यवाह व संकेतस्थळ संपादकांचे मनोगत

विजय वसंत वडुलेकर

(पुष्पावती रुंगटा कन्या विद्यालय, नाशिक)

(मोबा. ९८५००३५३३८)

 

सादर नमस्कार,

 

संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. रविंद्र जोशी यांच्या अथक परिश्रमाने आपल्या संघटनेचे हे अधिकृत संकेतस्थळ सुरु होत आहे याचा आपणा सर्वांना मनस्वी आनंद होत आहे.

 

शिक्षकेतर बांधवांना अनेक प्रकारची माहिती घेण्यासाठी नेहमी अनेक कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो, त्या कारणांसाठी अनेकांना प्रवास करावा लागतो .. अशा कार्यालयीन सूचना आपल्या या संकेतस्थळावरुन प्रसिध्द करुन हे श्रम वाचवावेत व अद्ययावत माहिती सर्व शिक्षकेतरांकडे असावी या साठी हा प्रयत्‍न आहे.

आपण सातत्याने या संकेतस्थळाला भेट दिल्यास आवश्यक माहिती सुचना आपल्या दारापर्यंत पोहचविण्याचा हा उपक्रम आहे. या बरोबरच महत्वाची परिपत्रके व माहिती आपल्याला या संकेतस्थळावरुन डाउनलोड करुन घेण्याची सुविधा आहे.

 

आपल्यातील अनेकांना अनेक प्रकारची विशेष माहिती असते, अभ्यास असतो; तर काही शंकाही असतात, काही माहिती मिळावी अशी गरजही असते, आपापसात असा संवाद सुकर करुन विचारांच्या देवघेवीतून एक सशक्‍त कार्यप्रणाली उभी व्हावी हे ह्या संकेतस्थळाचे उद्‍ईष्ट आहे.

 

आपल्या प्रत्येकात काही विशिष्ट गुण असतात, त्यांचे एकत्रीकरण होऊन उत्तम कार्य साध्य करण्याचे सामर्थ्य निश्‍चितच उत्पन्न करता येते. आपल्यातील अशा गुणी व्यक्‍तित्वांचा शोध घेऊन त्यांना उचीत कर्तव्यांचे स्मरण व्हावे व त्यांच्यास अनेकांना यातून प्रेरणा मिळावी व ह्याने संघटनेची संघटन शक्‍ती ही सशक्‍त व्हावी हे या उपक्रमांचे नवनीत असावे असा मानस आहे.

 

आपल्या अनेक न्याय मागण्यांसाठी प्रयत्‍न करणे आणि आपण सर्वांनी नित्य कामात आपल्या शाळेच्या उन्नतीसाठी आपले योगदान पूर्णत: समर्पित करण्याचा निश्‍चय करणे या साठी या संकेतस्थळावरुन संवांद घड्वून आणावयाचा संकल्प आहे..

आपला हा हेतू सर्वांगाने सफल व्हावा या साठी आपण सर्वांनी आपले मनोगत, विशेष माहिती, सूचना, मागण्या संघटनेकडे जरुर पाठवाव्यात त्यास आपल्या नांवासह प्रसिध्दी देता येईल व त्यावर उचीत कार्यवाही करता येईल.

 

आपल्या सर्वांच्या योगदानासह या संकेतस्थावरुन पुढील प्रकारची माहिती देण्याचा संकल्प आहे. महत्वाची परिपत्रके, शिक्षण विभागाशी निगडित सर्व विभागांनी शांळांना द्यावयाच्या सूचना, संघटनेच्या विविध योजना, शासनाकडे सादर करावयाच्या शिक्षकेतरांच्या विविध मागण्या, संघटनेचे विविध कार्यक्रम, रजा, सेवानिवृत्‍ती वेतन, व्यवसायकर, आयकर, महागाई भत्‍ता दर इ. माहिती

 

आपली संघटना हे कार्य यशस्वीपणे करणार आहे व आपली संघट्ना चिरायू होणार आहे हे निश्‍इचतच! आपल्या योगदानाच्या प्रतिक्षेत.......